फार पूर्वी ऐकलेली एक गोष्ट. त्याकाळीं नारळ 4 आणे (=हल्लीच्या काळातले 25 पैसे) या किंमतींत मिळत असत. एका माणसाने बाजारांत सगळीकडे फेरी घातली. 4 आण्यापेक्षा स्वस्त नारळ घेण्याकरतां. पहिल्या दुकानांत 4 आणे तर अजून पुढे गेल्यावर 3 आणे असं करत करत तो शेवटच्या दुकानांत आला. तिथे त्याला अगदी 1 आण्याला नारळ मिळाला असता. त्याने आणखी स्वस्त नारळ घेण्याकरता चौकशी केली तेंव्हा त्याला पुढच्या गावांता अनेक नारळाची झाडं असून नारळ फुकटांत मिळण्याची सोय असल्याचं समजलं. त्याने तिथे जायचं ठरलं. खरोखर नारळ फुकट मिळणार होता पण एक अट होती. नारळ स्वत: झाडावर चढून घ्यावे लागणार होते. या माणसाला तसा अनुभव नव्हता तरी फुकट नारळ मिळणार म्हणून तो एका झाडावर चढला आणि पाय घसरून खाली पडून मेला.

लोड होत आहे...